औषध प्रतिनिधी
MR / औषध प्रतिनिधी ह्या व्यक्ती एकंदरीत लोकाना माहीत असतात. टाय लावलेल्या व्यक्ती ज्या हॉस्पिटल्स, दवाखान्यात, मेडिकल stores मध्ये वावरत असतात. पेशंट्सच्या लाईन मधे डॉक्टर ने बोलावलं कि डॉक्टर ला जाऊन भेटतात. ह्या व्यक्ती डॉक्टरांकडे आपापल्या कंपनीची औषधे/
प्रोमोट करत असतात / विकत असतात. पण ह्या प्रकारात डॉक्टरांचा म्हणजे पर्यायाने पेशंट्स चा सुद्धा वेळ खातात असा ग्रह सर्वांचा होतो. येत नाही किंवा वेळ देत नाहीत. मग त्या औषधांची माहिती कोण देणार ? ती माहिती MR ने द्यावी अशी डॉक्टर्स ची अपेक्षा असते. परंतु आजची हा एक विषय आपण समजून घेऊ , त्याचे वेगळे वेगळे पैलू समजून घेत.
- कित्येक डॉक्टर्स ना औषधांची पूर्ण माहिती नसते. होय. त्यांना journals, reference बुक्स वाचायला वेळ देताती वेगळी आहे.
- डॉक्टर्स हे समाजातील माननीय घटक समजले जातात. त्यांनी मिळविलेल्या अमूल्य शिक्षणा व्यतिरिक्त त्यांना आदर दिला जातो तो त्यांच्या व्यवसायामुळे . पेशंट्स च्या आरोग्याची काळजी , पेशंट्स ना रोगांच्या कचाट्यातून सोडवणे आणि जीव वाचवणे हा तो व्यवसाय. अशा व्यक्तीला हे MRs जर भेटून काही मौलिक ज्ञान देणार असतील तर MR सुद्धा त्या तयारीचा हवा , ज्ञान/माहिती/अनुभव ह्या सर्वाने समृद्ध . तसंच उत्तम/योग्य संभाषण कला आणि मुख्यत्वे अनुरूप ड्रेस सोबत हवाच ना. डॉक्टर्स ना तो भेटावा असा वाटावा.
- वैद्यकीय व्यवसाया मध्ये , डॉक्टर्स नी MRs भेटावे , त्यांचे ऐकून घ्यावे , मान राखावा त्यांच्या ह्या सेवेचा पूर्वापार ही पद्धत / परंपरा चालत आली आहे.
- ह्या कामासाठी MRs ना medical शब्द , रोगांबद्दल जुजबी माहिती, औषधांचे नमुने/पर्याय त्या रोगांवर, औषधांचे डोस , औषधे घेण्याच्या पद्धती इत्यादी बाबींचे ज्ञान हवे आणि ते देण्याची जबाबदारी त्या कंपनी ची असते.
पण …कित्येक कंपन्या आपल्या MRs ना योग्य ट्रेनिंग देत नाहीत. साहजिकच तो MR , डॉक्टराना उपयुक्त माहिती देत नाही ,डॉक्टर्स वर छाप पाडू शकत नाही आणि वेळ मात्र खातो डॉक्टर्स चा आणि पेशंट्स चा पण.
ह्या माहितीला पर्याय म्हणजे इंटरनेट च्या माध्यमातून डॉक्टर्स नी ती माहिती मिळवावी किंवा इंटरनेट/ सोशल मीडिया च्या माध्यमातून कंपन्यांनी ती माहिती पुरवावी. ह्या पद्धतीने डॉक्टर्स त्यांच्या वेळेच्या सोयी नुसार माहिती घेऊ शकतात. ह्या पर्यायामुळे किंवा एकंदरीत अनुभवांमुळे बहुतांश डॉक्टर्सना आज, बहुतांश MR नकोसे वाटतात. काही डॉक्टर्स नी MRs भेटण्यास/ वेळ देण्यास, नकार देणे चालू केले आहे.
अशी परिस्थिती/मनःस्थीती chemists ची पण होत चालली आहे. केमिस्टस कडे सुद्धा ही मंडळी MRs/ त्यांच्या बरोबरचे managers ,(काही अपवाद वगळता) कित्येक निरर्थक प्रश्न विचारून , केमिस्टस चा वेळ घालवतात किंवा त्यांना इरीटेट करतात.
ह्यात डॉक्टर्सचे / केमिस्टसचे काय चुकले , माझ्या मते काहीच नाही. तुम्हास काय वाटते , जरूर कळवा…इथे.