Super Foods – Part 2 – Bhendi/Ladyfinger

ेंडी ( Okra – Lady fingers)

जठराग्नी , जो आपल्या जठरात प्रज्वलीत असतो /होतो  हा कमी प्रज्वलीत होणे / वेळी प्रज्वलीत नसणे हे माणसाच्या ५० टक्के आजाराला कारणीभूत असते. म्हणूनच अन्नाला पूर्णब्रह्म म्हणतात. आपले आरोग्य (शारीरिक) आरोग्य हे आपल्या मानसिक आरोग्याशी निगडीत असतेच पण आपल्या करीअर मध्ये महत्त्वाचीच नव्हे आमूलाग्र भूमिका निभावते .

व्हेजीटेरियन आहारातील एक साधी भेंडी ची भाजी, ज्याला सुपर फूड्स म्हणून मान्यता आहे भेंडीच्या बियात जड असा पारदर्शक द्रव असतो, तो पोटाचे विकार विशेषतः बद्धकोष्ठता (constipation)  आणि ऍसिडिटीच्या त्रासांवर  विशेष इलाज करतो. भेंडीतील तंतूमय भाग बद्धकोष्ठता रोखतो. हे तंतू मऊ असल्यामुळे अन्य कठीण वनस्पतीज तंतूप्रमाणे ते आतड्याच्या आतल्या मऊ मांसल थरांना ओरखडे पाडीत नाहीत. त्याच्या घसरट गुणधर्मामुळे न पचलेल्या अन्नाचा घन भाग मोठ्या आतड्यातून सहज निसटत गुदद्वारामार्गे शरीराबाहेर पडतो. म्हणून सारक अशी ही भेंडी जास्त परिपूर्ण , लाभदायक ठरते.

इलिनोईस युनिव्हर्सिटीतील एक संशोधक डॉ. सिल्विया झूक यांच्या नोंदणीनुसार भेंडीची भाजी ही विविध अन्नद्रव्यांचे पॉवर हाऊस आहे. त्यातील अर्धा हिस्सा गम आणि पेक्टिनच्या धाग्याच्या रुपात असतो. त्यातील विद्राव्य तंतूमय अन्नामुळे रक्तातला कोलेस्टरॉल कमी होतो, तसेच हृदयविकार मंदावतात. जो अतिद्राव्य तंतूमय चोथा असतो तो पचनेंद्रियाचा मार्ग मोकळा ठेवण्यास हातभार लावतो. भेंडी सतत खाल्ल्याने आतड्याच्या कर्करोगापासून आपली सुटका होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठीसुद्धा या भाजीचा हातभार लागतो.

या भाजीत बी-६ हे जीवनसत्त्व तसेच शरीराला उपयुक्त असे फॉलिक acid देखील मुबलक असते शिजविलेल्या अर्धा कप भाजीत खालीलप्रमाणे अन्नसाठा असतो :                                                     

  कॅलरीज – २५

तंतूमय अन्न – २

ग्रॅम प्रथिने – १.५ ग्रॅम

कार्बोहायड्रेटस् – ५.८ ग्रॅम                                                        

जीवनसत्त्व अ – ४६९ युनिट

जीवनसत्त्व क – १३ मिलीग्रॅम                 

फॉलिक आम्ल – ३६.५ मिलीग्रॅम,  

लोह – ०.४ मिलीग्रॅम                         

पोटॅशियम – २५६ मिलीग्रॅम

मॅग्नेशियम – ४६ मिलीग्रॅम

भेंडीमध्ये अनेक प्रकराचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कैल्शियम, फॉस्फरस, सोडियम सुद्धा भेंडीमध्ये आहेत.

शरीराच्या स्वास्थ्याला पोषक ठरणार्‍या जीवाणूच्या वाढीस ही भाजी हातभार लावते.( Probiotic) कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते.पण या सर्व प्राप्तीसाठी भेंडीची भाजी अर्धवट उकळवून खाल्लेली बरी हं !

भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.

भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खुप लाभदायी आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *